Ad will apear here
Next
सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क
पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार (१९ मे) भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने मतदारांशी थेट संवाद साधणे शक्य होते; मात्र येत्या २८ मे रोजी मतदान असल्याने त्यापूर्वीचे दोन दिवस प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे पुढील रविवारी प्रचार करणे शक्य नसल्याने याच रविवारी भाजपने मतदारांच्या थेट भेटीगाठींवर भर दिला.

गेला महिनाभर सुरू असलेली पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने भाजपने मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले आहे; मात्र भाजप कार्यकर्त्यांची फौज मतदारांच्या थेट संपर्कात राहून मतदारसंघातील वातावरण भाजपमय करण्यासाठी कामाला लागली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख शहरांत मोटारसायकलींवर भाजपचे झेंडे लावून रस्त्यांवरून फिरणारी तरुणाई अधिक प्रमाणात दिसली. सुट्टी असल्याने युवक आणि महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता. दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली.

जिल्ह्यातील विविध शहरातील उच्चभ्रू वसाहतीप्रमाणेच झोपडपट्ट्या, सोसायट्या अशा सर्वच भागात जास्तीत जास्त संख्येने पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. कामगार, व्यापारी, कष्टकरी, मुस्लीम, दलित अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार करत होते.

याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना भाजपने पालघर जिल्ह्यासाठी तयार केलेल्या नियोजित विकास आराखड्याची माहिती देत होते. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॉट्सअॅप, आणि ट्विटरसारख्या माध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचार नियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPHBO
Similar Posts
शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध समाजघटक भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. पालघरसारख्या आदिवासीबहुल भागासह राज्याच्या विविध भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा पालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली.
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
‘मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही,’ असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी (ता. २३) केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language